'वेस्टन' लघुपट तरुण पिढीपर्यंत पोहोचवा - खा. सुप्रिया सुळे

प्रशांत चवरे
गुरुवार, 28 जून 2018

भिगवण (पुणे) : तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास प्रगती होऊ शकते परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे तरुण पिढीचे नुकसान होत असल्याचे चित्र समोर येत आहे. इंदापुर तालुक्यातील डिकसळसारख्या ग्रामीण भागातील तरुणांनी या वस्तुस्थितीवर लघुपटाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. मोबाईलबाबत तरुण पिढीचे प्रबोधन करण्यासाठी हा लघुपट निश्चित उपयोगी ठरेल. हा लघुपट जास्तीत जास्त तरुणांपर्यत पोचविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

डिकसळ (ता. इंदापुर) येथे निर्माते विजयकुमार गायकवाड व दिग्दर्शक पंकज यादव निर्मित वेस्टन या लघुपटाचे पोस्टर अनावरण व प्रदर्शन खासदार सुळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, डी.एन. जगताप, विजयराव शिंदे, सचिन बोगावत, तेजस देवकाते, विजयकुमार गायकवाड व चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, चित्रपट किंवा लघुपट हे प्रबोधनाचे मोठे माध्यम आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सांगितलेली बाब तरुणांना लवकर भावते. वेस्टन लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. मी स्वतः सोशल मिडियाच्या माध्यमातून हा लघुपट जास्तीत जास्त तरुणांपर्यत पोचविण्यासाठी प्रयत्न करेन. प्रास्ताविकामध्ये विजयकुमार गायकवाड यांनी वेस्टन चित्रपटाच्या निर्मीतीमागील भुमिका विषद केली. सुत्रसंचालन पंकज यादव यांनी केले तर आभार रामचंद्र पाचांगणे यांनी केले.

Web Title: shortfilm westan reach to everyone said mp supriya sule