द्रुतगतीवर आडोशीजवळ शोल्डर लेन खचली

द्रुतगतीवर आडोशीजवळ शोल्डर लेन खचली

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ‘शोल्डर लेन’ खचली. द्रुतगती मार्ग व लगतचा भराव यादरम्यान मोठी भेग पडल्याने अपघाताबरोबर द्रुतगती मार्गालाही धोका निर्माण झाला आहे. 

सध्या लोणावळा, खंडाळासह बोरघाटात मोठा पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याच्या सलग दोन घटना घडल्या होत्या. बोरघाटात कोट्यवधी रुपये खर्च करूनही दरडींचा धोका कायम आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातच पुण्याच्या दिशेने आडोशी बोगद्यालगत द्रुतगती मार्गालगत शोल्डर लेनदरम्यान मोठी भेग पडली आहे; तसेच आडोशीजवळ काही ठिकाणी द्रुतगती मार्गाला तडे गेले आहेत. आयआरबी कंपनीच्या वतीने तात्पुरती डागडुजी केली असली, तरी या ठिकाणी वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताची शक्‍यता आहे. दरम्यान, आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आडोशी बोगदा परिसराची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com