
Beautifully decorated Rath of Shreemant Dagdusheth Halwai Ganpati ready for the grand Visarjan procession in Pune.
esakal
Shreemant Dagdusheth Ganpati Visarjan 2025: राज्यभरात आत लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. मुंबई, पुण्यासह सर्वच प्रमुख शहरांमधील गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे येथील विसर्जन मिवरणुकीचा उत्साह काही वेगळाच असतो, शिवाय या मिरवणुका पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी होत असते. आज सकाळपासूनच पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. हळूहळू एक एक गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे.
दरम्यान, पुण्यातील महत्त्वाचा आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतींची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे. तत्पुर्वी गणरायला नेण्यासाठीचा विशेष रथ सज्ज झालेला आहे. या रथावर आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे.उत्सवाचं यंदा 133 वं वर्ष आहे. यंदा 'श्री गणनायक' रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.या विसर्जन मिरवणुकीच्या रथाचे काम आता पूर्ण झालेल आहे.
आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणी करण्यात आली आहे.
विष्णूचे वाहन म्हणून श्री गणनायक रथावर समोरच्या बाजूला चार गरुड लावण्यात आलेले आहेत.आठ स्तंभांवर हा रथ उभारण्यात आला आहे. केरळ मधील मंदिरांना असते त्याप्रमाणे या रथाला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.
केरळमधील मंदिरांप्रमाणे गोपुराही यामध्ये साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलायं.त्याचप्रमाणे 30 क्रिस्टल झुंबर या रथाला बसविण्यात आले आहेत.तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या रथाला चार सीसीटीव्हीही बसवण्यात आलेले आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.