श्री शिवछत्रपती महाविद्यालयाची केरळ पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

दत्ता म्हसकर
रविवार, 26 ऑगस्ट 2018

जुन्नर : येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास मंडळाने केरळ व कर्नाटक राज्यातील पुरग्रस्तासाठी आज रविवारी ता.26 रोजी मदतफेरीचे आयोजन केले होते. पूरस्थितीमुळे येथील जनजीवन उध्वस्त झालेले आहे. जिवित व आर्थिक हानी मोठया प्रमाणावर झालेली आहे.

जुन्नर : येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास मंडळाने केरळ व कर्नाटक राज्यातील पुरग्रस्तासाठी आज रविवारी ता.26 रोजी मदतफेरीचे आयोजन केले होते. पूरस्थितीमुळे येथील जनजीवन उध्वस्त झालेले आहे. जिवित व आर्थिक हानी मोठया प्रमाणावर झालेली आहे. एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थान रक्षाबंधन तसेच आठवडे बाजाराचे औचित्य साधून शहरातील बोडके नगर, नवीन स्टँड, बाजार समिती, धान्य बाजार, परदेशपुरा व नेहरू बाजारात केरळ मधील पूरग्रस्तांसाठी हवा बंद खाद्यपदार्थ यामध्ये बिस्कीट व इतर खाद्यपदार्थ, 15 किलो तांदूळ, अन्नधान्य, कडधान्य इत्यादी खाद्यपदार्थ संकलित केले.

कापड दुकानदारांनी  22 नवीन जीन्स पँट, 12 टी शर्ट, अंर्तवस्त्रे व शर्ट आदी कपडे दिले. इलेक्ट्रीकल साहित्य, डेटॉल, साबण, वॉशिंग पावडर इत्यादी वस्तूंचे संकलन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांच्याकडून सुमारे 12 हजार तसेच मदत फेरीतून खाद्य पदार्थ व कपडे, इलेक्ट्रीकल वस्तूच्या किमंतीसह व रोख रक्कम सर्व मिळून सुमारे 15 हजाराहून अधिक पेक्षा मदत निधी गोळा करण्यात आला. या सर्व वस्तू, खाद्यपदार्थ व रोख रक्कम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जमा केल्या जातील व तेथून केरळ व कर्नाटक वासियांना पोचवल्या जाणार आहेत. मदत फेरीचे आयोजन प्रा संतोष गवळी, प्रा. डॉ. बाबासाहेब माने व प्रा. सचिन कसबे यांनी केले. या फेरीत 65 विद्यार्थी सहभागी होते. प्रभारी प्राचार्य डॉ. सी. आर. मंडलिक, उपप्राचार्य व्ही. एस. जोशी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष अॅड. संजय काळे यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

Web Title: Shri Shiv Chhatrapati College's help round for Kerala flood victims