
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक शेषात्मज रथातून सकाळी साडे आठ वाजता सुरू झाली. यावेळी गर्दी केलेल्या भाविकांनी मोठ्याने मोरया मोरयाचा जयघोष केला. श्री गणेश सूर्यमंदिरात सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली
शेषात्मज रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक शेषात्मज रथातून सकाळी साडे आठ वाजता सुरू झाली. यावेळी गर्दी केलेल्या भाविकांनी मोठ्याने मोरया मोरयाचा जयघोष केला. श्री गणेश सूर्यमंदिरात सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प.पू.विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली
ही मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, प्रभात बॅंड, मयूर बॅंड, दरबार बॅंड यांसह चिंचवड गाव येथील गंधाक्ष वाद्यपथक देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर गुरुजी यांनी केली.