दुसऱ्यासाठी मदत ही सामाजिक जाणीव - श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

खडकवासला - हाताची ओंजळ करून मागणे म्हणजे स्वतःपुरते असते; परंतु पदर पसरून मागणे म्हणजे समाजासाठी असते. माझ्यापलीकडे असणाऱ्या जगाला काहीतरी हवे आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तीकडे मदत मागणे ही सामाजिक जाणीव आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

परिवर्तन संस्थेतर्फे युवा पुरस्कार नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, ट्रायथलॉन खेळाडू विराज परदेशी यांना, तर परिवर्तन सेवा गौरव पुरस्कार ‘ग्यान की लायब्ररी’चे प्रमुख प्रदीप लोखंडे यांना राज्यपाल पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी उद्योगपती पुनीत बालन, शेखर वाल्हेकर आणि शुभांगी जाधव, नांदेडच्या सरपंच राजश्री वाल्हेकर, उद्योजक सुनील भिडे, मामा जाधवराव, रूपाली चाकणकर, सारंग पाटील उपस्थित होते. या वेळी सातारा जिल्ह्यातील १०७ मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना तेजस्विनी सावंत-दरेकर म्हणाल्या, ‘राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्या वेळी जयसिंगपूरमध्ये वडिलांच्या मित्राची पानाची टपरी होती. तेथील डब्यावर माझी व खेळाची माहिती लिहून मदत गोळा केली होती.’ प्रास्ताविक सुनील मते, सूत्रसंचालन देवा झिंजाड, तर किशोर ढगे यांनी आभार मानले.

Web Title: shrinivas patil talking