पुणे-तुळजापूर उलट चालून गुंड घालणार समाजहिताचे साकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे- सध्या राज्य आणि देशात होत असलेल्या विविध नकारात्मक घडामोडींबद्दल लोक चर्चा करताना दिसतात. मात्र, या घटनांच्या अनुषंगाने त्यातून सकारात्मक फलनिष्पत्ती व्हावी यासाठी एक व्यक्ती देवाला साकडे घालणार आहे, तेही पुण्याहून पंढरपूर मार्गे तुळजापूर ते चक्क उलट चालत जाणार आहेत. 

मराठा आरक्षण मंजूर व्हावे, महिलांवरील अत्याचार थांबावेत, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, रस्ते अपघात रोखावेत, पोलिसांवरील हल्ले थांबावेत, शेतकऱ्यांना सुखा-समाधानाने जगू द्यावे, नोटाबंदीमुळे होणारा नागरिकांचा त्रास कमी व्हावा, निवडणूक गैरव्यवहार टळावेत, पत्रकारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, पंतप्रधान, राष्ट्रपतींनी या विषयांची दखल घ्यावी, आणि या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला सदबुद्धी द्यावी, असे साकडे श्रीपतराव दगडोपंत गुंड हे विठ्ठल आणि तुळजा भवानीच्या चरणी घालणार आहेत. 

आपल्या मागण्या लिहिलेला लक्ष वेधून घेणारा खास रंगीबेरंगी असा शर्ट घालून गुंड उलट चालत जाणार आहेत. दगडूशेठ आणि तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेऊन गुंड हे उलट पायी चालत जाण्याच्या या यात्रेला प्रारंभ करणार आहेत. 
 
Web Title: shripatrao gund to walk reverse from pune to tuljapur for maratha reservation