Takli Haji Land Dispute Turns Violent
संजय बारहाते
टाकळी हाजी : शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीदास आनंता भाईक (वय ५६वर्ष ) रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या घरासमोर बसले असताना आरोपी अनिल भाईक तेथे आला. फिर्यादी यांनी त्यांच्या गट क्रमांक 269 मधील सर्व्हे नंबरची खूण दाखवून, “तू हरी भाईक यांच्याकडून जमीन विकत घेतली आहेस, त्यांच्याकडून मोजणी करून घे,” असे समजावून सांगत असतानाच आरोपी संतापला.