esakal | तिसरे अपत्य असल्याने वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी कानडे अपात्र
sakal

बोलून बातमी शोधा

Shubhangi Kanade
तिसरे अपत्य असल्याने वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी कानडे अपात्र

तिसरे अपत्य असल्याने वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी कानडे अपात्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव - १२ सप्टेंबर २००१ नंतरचे तिसरे अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ ( ज १) नुसार वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी शाम उर्फ श्याम कानडे यांचे सदस्य पद अपात्र ठरवण्यात आले आहे. या बाबतचा निकाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

याबाबत माहिती अशी: जुन्नर तालुक्यात अग्रेसर असलेल्या वारूळवाडी ग्रामपंचायतीची अटीतटीची निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी झाली होती.प्रभाग तीन मधुन शुभांगी कानडे या विजयी झाल्या होत्या. शुभांगी कानडे यांना १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य असल्याची तक्रार त्यांच्या विरोधी उमेदवार मीना संतोष वारुळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. मीना वारुळे यांनी पुरावा म्हणून सादर केलेला जन्म दाखला व जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा अहवाल यांची पडताळणी जिल्हाधिकारी यांनी केली.

हेही वाचा: केंद्र सरकारकडून बळीराजाला चिरडण्याचा प्रयत्न

सदस्या शुभांगी कानडे यांना १८ ऑक्टोबर २००२ रोजी जन्म झालेले विनायक हे तिसरे अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने शुभांगी कानडे यांना वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.असा निकाल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी दिला आहे.

याबाबत वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात येणार आहे.

loading image
go to top