Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगर मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळेंनी भरला उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

अर्ज दाखल करण्याआधी शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिर येथून कार्यकर्त्यांनी त्यांची जंगी मिरवणूक काढली.

पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीच्या शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी (ता.3) अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू कलादालन येथे निवडणूक अधिकारी अस्मिता मोरे यांच्याकडे शिरोळे यांनी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्याआधी शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिर येथून कार्यकर्त्यांनी त्यांची जंगी मिरवणूक काढली. माजी खासदार अनिल शिरोळे, शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विजय काळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, शिवाजीनगरमधील नगरसेविका जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नगरसेवक मधुकर मुसळे, आदित्य माळवे, विजय शेवाळे, प्रकाश ढोरे यांच्यासोबत शिवसेनेचे शिवाजीनगर विभाग प्रमुख राहुल शिरोळे उपविभाग प्रमुख मंगेश खेडेकर, माजी उपविभाग प्रमुख राजेश मांजरे यावेळी उपस्थित होते.

भाजपसाठी पुण्यातील महत्त्वाच्या मतदार संघांपैकी शिवाजीनगर हा एक महत्त्वाचा मतदारसंघ ठरला आहे. याआधी सिद्धार्थ शिरोळेंचे वडील अनिल शिरोळे 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतून खासदार म्हणून निवडून आले होते. यंदा पार पडलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने अनिल शिरोळेंना उमेदवारी दिली नव्हती. त्याऐवजी लोकसभेसाठी गिरीश बापटांना भाजपचे तिकीट मिळाले होते. मात्र, विधानसभेसाठी भाजपने अनिल शिरोळेंचे पुत्र सिद्धार्थ शिरोळेंना उमेदवारी दिली आहे.  

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : पुण्यात पीएमपीने प्रवास करत भरला उमेदवारी अर्ज

- Vidhan Sabha 2019 : अमित, धीरज देशमुख यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

- Vidhan Sabha 2019 : मेगाभरती ते ‘मेगानाराजी’; युतीतील चित्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Shirole has filed his nomination from Shivajinagar constituency for Maharashtra Vidhansabha 2019