Vidhan Sabha 2019 : सिध्दार्थ शिरोळेंना आयटी हबच्या तरुणाईचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

Vidhan Sabha 2019 पुणे : “प्रचार मोहीम सुरू केल्यापासून मतदारांशी संवाद साधताना मला अतिशय सुखद अनुभव येत आहेत. आज इतक्या मोठ्या संख्येने तरुणाईने दिलेल्या पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. पुण्याची ओळखच आयटी हब आणि तरुणाईचे शहर अशी असल्याने या पाठिंब्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. उच्चशिक्षित तरुणाई ही आज प्रशासन, राजकारण आणि निवडणुकीत सहभाग नोंदवत आहे ही खरोखरच चांगल्या बदलाची नांदी आहे,” असे सिद्धार्थ शिरोळे म्हणाले.

रविवारी सकाळी शिवाजीनगर परिसरातील आयटी-अभियांत्रिकी व्यावसायिका मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी सिद्धार्थ शिरोळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

तसेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीच्या शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी,बोपोडी येथील पुणे- मुंबई रेल्वे लाईन गेट क्र. २० च्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाश्यांची  भेट घेऊन. समस्या जाणून घेतल्या.लवकरच रेल्वे लाईनचे विस्तारीकरण होणार असून त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्या येणार आहेत. या समस्या दूर करीत यावर लवकरच उपाय काढू, असे आश्वासन शिरोळे यांनी दिले. बोपोडी गावठाण प्रभागाचे नगरसेवक प्रकाश ढोरे हे देखील यावेळी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Shirole has support of IT hub youth for Vidhan Sabha Maharashtra 2019