
-संशोधन संस्थांचा दावा; श्री श्री रविशंकर यांनी केली घोषणा.
पुणे ः कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सिद्धा आयुर्वेदातील "कबासुर कुडीनीर' हे औषध प्रभावी ठरत आहे. यासंबंधीचा दावा फ्रॅंकफर्ट बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर (एफबीआयसी), सेंटर काउंसिल फॉर रिसर्च इन सिद्धा (सीसीआरएस) आणि श्री श्री तत्वा या संशोधन संस्थांनी केला आहे. औषधाची घोषणा सोमवारी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेद्वारे केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पत्रकार परिषदेला एफबीआयसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. क्रिश्चन गार्बे, आयुषचे डॉ. राजा. एम., सीसीआरएसच्या महासंचालक डॉ. के. कनकवल्ली, श्री श्री तत्त्वाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद वर्चस्वी आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. ते म्हणाले,""प्रथमच पारंपरिक आयुर्वेदिक औषधांकडे समग्र दृष्टिकोनातून पाहण्यात आले आहे. संशोधनातून आणि औषधांच्या चाचण्यांमधून आयुर्वेदिक औषधांचीही उपयुक्तता सिद्ध होत आहे. यामध्ये अधिक संशोधन करायला हवे.'' कोरोनाच्या उपचारासाठी आम्ही "आर्युजिनोमिक' हा संशोधन प्रकल्प हाती घेतला. त्यामध्ये आयुर्वेदिक औषधांची रोगप्रतिकारशक्ती आणि प्रतिबंधात्मक कार्यप्रणाली तपासण्यात येत असल्याचे, डॉ. गार्बे यांनी सांगितले.
"कबासुर कुडीनीर'ची वैज्ञानिक परीक्षा ः
चाचणी पहिली ः
- फ्रान्स येथील फ्रॅंकफर्ट इनोव्हेशन ऍण्ड बायोटेक्नॉलॉजी येथे कोरोना विषाणूवर असलेल्या स्पाईक प्रथीनांसंबंधी चाचणी घेण्यात आली.
- स्पाईक प्रथिने आणि मानवी पेशीतील एससीई एन्झाईम यांच्या अभिक्रियेला 84 टक्के प्रतिबंध करते.
ृ- अमृथ आणि इम्युगन हे आयुर्वेदिक रसायनेही अनुक्रमे 60 आणि 80 प्रतिबंध करते. तसेच च्यवनप्राश 70 टक्के कोरोना प्रसाराला प्रतिबंध करते.
पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..
--
चाचणी दुसरी ः
- बंगळूर येथील नारायण आयुर्वेदालयामध्ये त्यामध्ये सौम्य लक्षणे दिसणाऱ्या रुग्णावर परीक्षण करण्यात आले. त्याचे निकाल सकारात्मक असून, 28 दिवसांमध्ये रुग्णांवर कोणताही नकारात्मक परिणाम दिसला नाही.
श्री श्री तत्त्वाचे इतर उत्पादने ः
शक्ती ड्रॉप, अमृथ टॅब्लेट, टर्मरिक प्लस टॅब्लेट, तुलसी अर्क ड्रॉप या आयुर्वेदिक औषधांचीही परीक्षण करण्यात आले आहे. बंगळूर मेडिकल कॉलेज ऍण्ड रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये सौम्य लक्षणे दिसणाऱ्या 40 कोरोना बाधितांना आणि 96 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही औषधे देण्यात आली होती. संबंधित औषधांमुळे रुग्णांना फायदा झाल्याचा दावा, श्री श्री तत्वा या संस्थेने केला आहे.
मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत
उपचाराची पद्धतीमध्ये अडकून न पडता, त्याकडे समग्र दृष्टीने पहायला हवे. आयुर्वेदाला आता जगात स्वीकृती मिळत असून, आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर आयुर्वेदाला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. अशा संशोधनातून आयुर्वेद यशस्वी होत असल्याचे समोर आले आहे. -श्री श्री रविशंकर, संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग.
(संपादन : सागर डी. शेलार)