आठ महिन्यांपासून सिग्नल बंद अवस्थेत, नागरिक त्रस्त

संदीप जगदाळे
गुरुवार, 29 मार्च 2018

हडपसर - गाडीतळ येथील गेल्या आठ महिन्यांपासून सिग्नल यंत्रणा बंद असून, ती अदयाप सुरू झालेली नाही. तरी सिग्नलयंत्रणा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या महत्त्वाच्या चौकात महापालिकेकडून सिग्नलयंत्रण बसवण्यात अली मात्र, सुरुवातीचे काही दिवस सोडले, तर ही यंत्रण कोलमडलेली आहे.

गाडीतळ चौक हा वर्दळीचा आहे. तसेच सासवड रस्त्याहून सोलापूर व शहरात जाणारी वाहने, पीएमपीं आगारातून सुटणा-या बसेस, सोलापूरहून सासवडकडे जाणारी वाहने ही एकाचवेळी चौकात येतात. वाहतूक पोलिसांना देखील वाहतूक नियमन करणे अवघड होते. शिवाय बाजारपेठेत अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात असल्याने या कोंडीत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली असून, प्रशासनाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. 

नागरिक संतोष खरात म्हणाले, गाडीतळ चौक परिसरात अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जातात. रिक्षा थांब्यावर बेशिस्तीने रिक्षा थांबलेल्या असतात. बसेस देखील भर रसत्यावर पार्कींग केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. छोटे-मोठे अपघात होत असून, त्यामुळे वाद होत होतात. ते पोलीस ठाण्या पर्यंतही पोहोचले आहेत. यापूर्वी देखील भिषण अपघात या चौकात झाले आहेत. प्रशासनाने यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे.

हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर म्हणाले, प्रायोगीक तत्वावर सिंग्नल सुरू केला होता. मात्र वाहतूक कोंडी सुटण्यापेक्षा वाहतूक कोंडी वाढत आहे. आगारातील काही बस थांबे पूलाखाली शिप्ट केले जाणार आहेत. तसेच बीआरटी अंतर्गत रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतरच हा सिग्नल सुरू करणे सोईस्कर ठरेल. 

Web Title: Signal closed for eight months, civilians suffer