
Pune Traffic Update
Sakal
खराडी : मुंढवा ते खराडी बायपास या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या रक्षक चौकातील वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणेचा गंजलेला खांब शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कोसळला. ही दुर्घटना घडली त्यावेळी येथील एका मॉलच्या चौकातील लाल दिवा लागल्याने या ठिकाणी वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. खांब कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक संथ झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी त्वरित येऊन खांब बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.