बारामती शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट 

मिलिंद संगई
Thursday, 16 July 2020

बारामतीत आजपासून सात दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. यात 20 जुलैपर्यंत कडक लॉकडाउन असेल, त्यानंतर काही प्रमाणात काही दुकानांना शिथिलता दिली जाणार आहे. 

बारामती (पुणे) : बारामती शहरात आज कडक लॉकडाउनला सुरवात झाली. येत्या सोमवारपर्यंत (ता. 20) औषधे, दवाखाने, दूध, शेतीविषयक कामे वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. सोमवारनंतर अत्यावश्यक सेवेला लॉकडाउनमधून सूट दिली जाणार असून, 23 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे.

 असा चेक करा बारावीचा रिझल्ट

बारामतीत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली होती. कोरोनामुक्त असलेल्या शहरात एक दिवस तर तब्बल 18 कोरोनाबाधित सापडले. त्यानंतर अनेकांनी लॉकडाउनची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उपविभगीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामतीत आजपासून सात दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. यात 20 जुलैपर्यंत कडक लॉकडाउन असेल, त्यानंतर काही प्रमाणात काही दुकानांना शिथिलता दिली जाणार आहे. 

येरवडा कारागृहातून पाच कैदी पळाले

दरम्यान, आज बारामती शहरातील रस्ते पोलिसांनी बंद केले होते. या लॉकडाउनची कल्पना बारामतीकरांना असल्यामुळे लोकही घरातच थांबून होते. त्यामुळे तुलनेने पोलिसांचे काम आज अधिक सोपे झाले होते. शहरात या लॉकडाउनमुळे नीरव शांतता होती. नागरिकांनी घरात बसून विश्रांती घेणे पसंत केले. रस्त्यावर शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता रस्त्यावर कोणीही नव्हते. 

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी आज शहराचा फेरफटका मारुन अनावश्यक रितीने फिरणा-यांना समज दिली. नागरिकांनी अतितातडीचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बारामतीकरांचे सहकार्य गरजेचे असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले. 

Edited By : Nilesh J shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silence on the streets of Baramati due to the lockdown