राममंदिराच्या पायाभरणीसाठी पुण्यातून चांदीची वीट पाठविली अयोध्येला

brick.jpg
brick.jpg

पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीचा सोहळ्यामध्ये आता पुणेकरांचाही लक्षणीय सहभाग असणार आहे. या पायाभरणीमध्ये पुणेकरांनी घडविलेल्या चांदीच्या विटेचा समावेश असणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणेकरांना अभिमान वाटावी अशी किमया रांका ज्वेलर्सच्या मानव रांका यांनी करून दाखवलेली आहे. "जय श्रीराम' ही अक्षरे असलेली 99.99 टक्के शुद्ध चांदीची वीट नुकतीच पुण्याहून अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहे. या विटेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू, नीलम अशी नवग्रहांची नवरत्ने देखील जडविण्यात आलेली आहेत.

भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून नवरत्नांचे महत्त्व आहे.
चांदीच्या विटेचे वजन 1011 ग्रॅम असून ही वीट मानव रांका यांच्या मार्गदर्शनाखाली 2 कारागिरांनी 2 दिवसात तयार केलेली आहे. श्रद्धा आणि पावित्र्याचा हा सुंदर आविष्कार घडविण्याचे भाग्य रांका ज्वेलर्सला पुन्हा एकदा लाभल्याची भावना रांकांनी व्यक्त केली.

अयोध्येमध्ये 5 ऑगस्ट 2020 रोजी राममंदिराचा पायाभरणी सोहळा होत आहे.पुणे शहर भारतीय जनता पार्टी व माजी सैनिक स्व. दरोगा सिंग यांच्या स्मरणार्थ नवीन सिंग यांच्या परिवारातर्फे ही चांदीची वीट अयोध्येला पाठविण्यात आलेली आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com