Sambhaji Brigade
Sambhaji BrigadeSakal

Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन २८ डिसेंबरला

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन २८ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडामंच सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
Summary

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन २८ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडामंच सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

पुणे - संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन २८ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडामंच सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा.मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले आदी मान्यवर अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी मराठी चित्रपट अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने तर, अभिनेते अशोक समर्थ आणि प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिवेशनात दुपारी १२ वाजता ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा’ या संकल्पनेवर आधारित ‘खासगीकरण, जागतिकीकरणानंतरचा भारत आणि जग’, दुपारी २.३० वाजता ‘एकविसावे शतक- स्टार्टअपचे युग’ आणि ३.३० वाजता ‘मराठा कम्युनिटी-बिझनेस कम्युनिटी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, शरद पवार यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com