Pune Fire Accident : सिंहगडावरील मोरदरी खिंडीत वणवा; वनसंपदा आगीत नष्ट

सिंहगड डोंगरावर वणवा लागल्याची घटना
Pune Fire Accident
Pune Fire Accidentsakal

खडकवासला : सिंहगडावरील डोंगरावर वर्षांतील पहिला वणवा लागल्याची घटना शुक्रवारी घडली. रात्री उशिरा‌ वणवा विझवण्यात आला. या परिसरातील वनसंपदा आगीत नष्ट झाली आहे. मोरदरी खिंडीत शुक्रवारी दुपारी वणवा लागला होता. तो वन संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी विजवला होता.

परंतु शुक्रवारी संध्याकाळी सहा सात वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात पुन्हा आग लागली. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर, भांबुर्डा वनविभागाचे वनपाल समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर संदीप कोळी मिळून वणवा विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

त्यानंतर वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक रात्री नऊ वाजता आले. परिसरातील वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षकांना देखील तातडीने बोलावून घेतले. वणवा विझवल्याने मोठे पथक आल्याने वणवा आटोक्यात आला.

अद्याप जाळपट्टे नाहीत

वन विभागाच्या हद्दीमध्ये वनवा लागल्यानंतर तो सर्वत्र पसरू नये म्हणून ठराविक अंतरावर काही क्षेत्र जाळले जाते. त्या क्षेत्राचे दोन भाग केले जातात. त्यामुळे एका बाजूला लागलेल्या दुसऱ्या बाजूला जात नाही. जाळपट्टे यंदा अद्याप काढलेले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com