Ganesh Visarjan: ६० ठिकाणी गणेशमूर्तींचे संकलन-विसर्जन; ५७ हजार ७३८ मूर्तींची नोंद

Sinhagad Road Ganesh Visarjan, 57,738 Idols, Pune PMC सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान ५७ हजार ७३८ गणेशमूर्तींचे संकलन व विसर्जन करण्यात आले. महापालिकेने ६० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती.
Pune Ganeshotsav

Pune Ganeshotsav

esakal

Updated on: 

धायरी : गणेशोत्सवाच्या काळात सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्तींचे नियोजनबद्ध पद्धतीने संकलन व विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक २८, ३३, ३४ व ३५ मध्ये महापालिकेच्या वतीने ६० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान तब्बल ५७ हजार ७३८ गणेशमूर्तींची नोंद झाली. यामध्ये ५३ हजार ४१२ मूर्ती लोखंडी टाक्यांमध्ये, ४ हजार २६९ मूर्ती होदांमध्ये विसर्जित करण्यात आल्या, तर ५७ मूर्ती स्वतंत्रपणे संकलित करण्यात आल्या. या कालावधीत १ लाख ४४५ किलो निर्माल्याचे संकलन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com