पुण्यातील 'या' रस्त्यावर सापडेना एकही स्वच्छतागृह

नीलेश बोरुडे 
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

किरकटवाडी - शहरातील महत्त्वाच्या व नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकानंतर थेट सिंहगडपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्याचे चित्र आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मुंबई-बंगळूर द्रुतगती मार्गावर उभारलेल्या वडगाव पुलाखाली असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याने येणारे-जाणारे नागरिक त्याच्या आजूबाजूला आणखी घाण करून जात आहेत. हे शौचालय आहे की मद्यप्राशन करण्याचे ठिकाण असा प्रश्न तेथे पडलेल्या मद्याच्या बाटल्या पाहून निर्माण  होतो.

सिंहगड रस्ता हा नेहमी गजबजलेला असतो. वाहनांची मोठी ये-जा या रस्त्यावरून होत असते. हिंगणे, आनंदनगर, वडगाव फाटा, नांदेड फाटा, धायरी फाटा, किरकटवाडी फाटा, खडकवासला गाव, डोणजे फाटा अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई दररोज भरत असतात. तासन्‌तास भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या महिलांना, भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा कोणालाच साधी लघुशंकेचीसुद्धा सोय या ठिकाणी दिसून येत नाही.

सिंहगड रस्त्यावर जागोजागी अघोषित अशी लघुशंकेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणांच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. काही ठिकाणी मद्य व्यावसायिकांची दुकाने रस्त्याला लागून आहेत. मद्यप्राशन केलेले नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्यांची पर्वा न करता लघुशंका करतात. अनेक ठिकाणी अंधार पडल्यानंतर महिलांना असुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती असते.

एकीकडे स्मार्ट सिटीचा भाग म्हणून मेट्रो उभारली जात आहे. गरज नसताना उभारलेले सायकल ट्रॅक वापराविना पडून आहेत. त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नाही, असे विदारक वास्तव व विरोधाभास सिंहगड रस्त्यावरून जाताना पहावयास मिळतो. 

नागरिक मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने हतबल आहेत. महापालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाग असो यांनी रस्ता तयार करताना किंवा सर्वेक्षण करून अशा महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sinhagad road toilets issue