Sinhagad Fort: सिंहगडावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सलग दोन दिवस मारामारी, दगडफेकीने खळबळ

Sinhagad Tourist Safety In Focus After Two Days Of Violence: सलग दोन दिवस सिंहगडावर छेडछाड, मारामारी व दगडफेकीच्या घटनांनी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण; व्हायरल व्हिडिओनंतर वन विभाग व पोलिस प्रशासनावर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
Sinhagad Tourist Rush Turns Tense As Two Days Of Fights And Stone Pelting Raise Major Safety Concerns For Visitors

Sinhagad Tourist Rush Turns Tense As Two Days Of Fights And Stone Pelting Raise Major Safety Concerns For Visitors

sakal

Updated on

खडकवासला : निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक सिंहगडावर येत असताना, मागील दोन दिवसांत घडलेल्या मारामारीच्या घटनांनी या आनंदाला गालबोट लागले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी छेडछाडीच्या प्रकारावरून दोन गटांत हाणामारी झाली. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओत दगडांनी मारहाण केल्याचे दिसून येत आहे. तर रविवारी अल्पवयीन मुलीच्या कपड्यांवरून मुलगी आणि ज्येष्ठ महिलेला तथाकथित दुर्गप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. सलग दोन दिवसांतील या घटनांमुळे कुटुंबासह गडावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सिंहगडावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com