‘सिंहगड’ने पटकाविला फिरोदिया करंडक

Drama
Drama

पुणे - आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा अर्थात फिरोदिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘राकस’ कलाकृतीने बाजी मारली. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘दिल चीज क्‍या है’ने दुसरा, तर फर्ग्युसनच्या ‘अजीज’ने तिसरा क्रमांक पटकाविला.

स्पर्धेत नऊ संघांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. नाटक, संगीत, नृत्याविष्कार, शॅडो प्ले, अनिमेशन, शिल्पकला, चित्रकला आदी कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या. फिरोदिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात झाली. त्यात सिंहगड, बीएमसीसी, फर्ग्युसनबरोबरच व्हीआयटी महाविद्यालय (मनहूस लाली), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (पालवी), आयएलएस लॉ कॉलेज (होशवालों को खबर क्‍या?), एआयएसएसएमए अभियांत्रिकी महाविद्यालय (सेकंड शिफ्ट) या संघांनी सादरीकरण केले. त्यात सिंहगडने बाजी मारली.अंतिम फेरीत सहभागी संघांतील वैयक्तिक पारितोषिकांची नामांकने दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. स्पर्धेसाठी चंद्रकांत कुलकर्णी, संगीतकार नरेंद्र भिडे, शेखर ढवळीकर, सीमा देशमुख यांनी परीक्षण केले. 

स्पर्धा सोशल मीडियावर
स्पर्धेच्या संयोजकांनी अंतिम फेरी केवळ नाट्यगृहापुरती मर्यादित ठेवली नाही. या फेरीतील कलाकृतींचे सादरीकरण सोशल मीडियावर सर्वांना पाहता यावे म्हणून या कलाकृतींचे यू ट्यूबवर लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com