Sinhgad Fort | सुट्टीच्या दिवशीच सिंहगड बंद; प्रशासनावरील संतापाचे पडसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sinhgad
सुट्टीच्या दिवशीच सिंहगड बंद; प्रशासनावरील संतापाचे पडसाद

सुट्टीच्या दिवशीच सिंहगड बंद; प्रशासनावरील संतापाचे पडसाद

पुण्यातला सिंहगड म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार. त्यामुळेच सुट्टीच्या दिवशी अनेकजण सिंहगड (Sinhgad Fort) सफारीसाठी राज्यभरातून येत असतात. मात्र आज रविवारी सिंहगड किल्ला बंद आहे. काय आहे यामागचं कारण?

पुण्यात आज सिहगड किल्ला बंद आंदोलन सुरु आहे. पीएमपीएमएल (PMPML) आणि वनविभागाच्या (Forest Department) ई-बसच्या भोंगळ कारभाराविरुद्ध सिंहगड बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राजे शिवराय प्रतिष्ठानकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सिहगड पायथा परिसरात हे आंदोलन सुरू आहे. पर्यटकांसाठी होत असलेली गैरसौय आणि घाटात होत असलेले बसचे अपघात यावर राजे शिवराय प्रतिष्ठान आक्रमक झाली असून आज सिंहगडावर बस न सोडण्याच्या तयारीत आहे.

आज रविवार असल्याने गडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. मात्र या आंदोलनामुळे आता पर्यटकांना फटका बसू लागला आहे.

Web Title: Sinhgad Fort In Pune Is Closed On Sunday Due To Protest Against Pmpml

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top