सिंहगड घाट वाहतुकीस बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

खडकवासला - सिंहगड घाटातील काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी हा रस्ता उद्या (ता. ११ ) पासून २० दिवसांकरिता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली. 

घाट रस्त्याचे दोन किलोमीटर पैकी एक हजार तीनशे मीटर काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७०० मीटरचे काम पूर्ण करायचे आहे. तसेच शेवटच्या दोन किलोमीटरच्या टप्प्यात अवघड वळणे आणि अरुंद रस्ता आहे. त्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 

दरम्यान, शिवजयंती, नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथीनिमित्त तो तात्पुरता सुरू केला होता. तिथीनुसार २३ मार्च रोजी शिवजयंती व २९ मार्च रोजी छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी असल्याने एक दिवस अगोदर काम बंद ठेवले जाणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinhgad Ghat Transport Close