या...पाहा...इथे काँक्रीटच्याही चिंधड्या होतात...!

नांदेड फाटा - काम रखडल्याने आवान हॉस्पिटलसमोर झालेली रस्त्याची दुरवस्था.
नांदेड फाटा - काम रखडल्याने आवान हॉस्पिटलसमोर झालेली रस्त्याची दुरवस्था.

किरकटवाडी - नांदेड फाट्यापासून डोणजे फाटा व डोणजे फाट्यापासून पानशेतपर्यंत सिंहगड रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; मात्र कामातील दर्जा पाहिल्यास कामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. ठिकठिकाणी खड्डे आणि रस्त्याला भेगा पडल्या आहेत.

बांधकाम विभागाकडून लोणावळा येथील एका कंपनीला हे काम देण्यात आलेले आहे. ज्या कंपनीने हे पूर्ण काम घेतलेले आहे ती कंपनी प्रत्यक्षात काम न करता इतर पोटठेकेदारांकडून काम करून घेत आहे. कंपनीने रस्त्याच्या कामाचे अंतरानुसार टप्पे केले असून, विविध छोट्या ठेकेदारांना कंपनीने हे काम दिलेले माहितीस पडते. लहान ठेकेदारांकडून रस्त्याच्या गुणवत्तेला मात्र हरताळ फासले जात असल्याचे दिसत आहे.

कोल्हेवाडी ते खडकवासलादरम्यान ज्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता बनवण्यात आलेला आहे, त्याला अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. प्रत्यक्षात काम करणाऱ्या ठेकेदारांना वेळेवर कामाचे पैसे मिळत नसल्याने अतिशय संथगतीने काम सुरू आहे. अनेक ठिकाणी काम थांबल्याचेच चित्र आहे. प्रशासन मात्र या सर्व गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. प्रशासन अशा ठेकेदारांना गुणवत्तेबाबत तडजोड करून का पाठीशी घालत आहे? रस्त्याच्या कामात गैरव्यवहार तर होत नाही ना? असे प्रश्न या भागातील नागरिक विचारत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांना विचारले असता, ‘येथून पुढे मूळ ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. १९ सप्टेंबर २०२० पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. मुदतीअगोदर रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मूळ ठेकेदार इतर ठेकेदारांकडून काम करून घेत असेल, तर त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com