Humanity : माणुसकीचे दर्शन : ...अन् तिला मिळाले मायेचे छत

पुण्यात सिंहगड रस्त्याला अशीच एक घटना घडली. वर्षभरापूर्वी हरवलेल्या एका महिलेला दुसऱ्या एका महिलेने शोधून काढून तिला मायेचे छप्पर मिळवून दिले.
Snehadhar Project Pune
Snehadhar Project PuneSakal
Summary

पुण्यात सिंहगड रस्त्याला अशीच एक घटना घडली. वर्षभरापूर्वी हरवलेल्या एका महिलेला दुसऱ्या एका महिलेने शोधून काढून तिला मायेचे छप्पर मिळवून दिले.

सिंहगड रस्ता - ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे एका गाण्यातील बोल जेव्हा प्रत्यक्षात खरे होतात, तेव्हा जग खूप सुंदर आहे याची अनुभूती येते.

पुण्यात सिंहगड रस्त्याला अशीच एक घटना घडली. वर्षभरापूर्वी हरवलेल्या एका महिलेला दुसऱ्या एका महिलेने शोधून काढून तिला मायेचे छप्पर मिळवून दिले. एका माउलीने दुसरीला सुरक्षित ठिकाण तर दिलेच; पण, माणुसकीचे दर्शन घडवत एका स्त्रीचे जीवन न कोमेजता ममत्वाने नव्याने फुलविले.

नीम नामक एक महिला तिच्या लहानपणापासून पुण्यात एका अनाथाश्रमात होती. ती मोठी झाल्यावर हिंगणे येथील मंजूषा नाईक यांनी, तिला त्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी आपल्या घरी आणले. ते मूल तीन-चार वर्षांचे होईपर्यंत नीम त्यांच्या घरातच होती. परंतु, एक दिवस संगीता नामक (बदललेले नाव) परिचयातील एक सामाजिक कार्यकर्ती मंजूषा यांच्या घरी आली. नीमला माझ्या बाळाच्या संगोपनासाठी नेते असे म्हणत संगीता नीमला घेऊन गेली.

नीम तेथेही मनपासून काम करत होती. एक दिवस नीम आजारी पडली. तिला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संगीता तिला घरी घेऊन गेली, परंतु नीमची सेवा सुश्रुषा करणे आपल्यास शक्य होणार नाही हे जाणवताच; संगीताने नीमला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. ‘मी, तुला पुन्हा घ्यायला येते,’ असे सांगून संगीता निघून गेली. नीम बरी झाली. मात्र, संगीता तिला घेण्यासाठी आलीच नाही. ‘माझी दीदी मला घ्यायला येणार आहे’, असे ती प्रत्येकाला सांगू लागली. वर्ष झाले तरी संगीता नीमला नेण्यासाठी आलीच नाही. तिकडे नीम मात्र रुग्णालयाच्या परिसरातच रस्त्यावर, जागा मिळेल तिथे राहू लागली.

दरम्यान, मंजूषा यांच्या सोसायटीचा सुरक्षारक्षक आबा कंघारे उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी त्याची पत्नी राधा हिने नीमला पाहिले. घडलेली सर्व हकीकत त्यांनी मंजूषा यांच्या कानावर घातली. त्यांना कळताच, त्यांनी नीमचे पुनर्वसन करायचे ठरवले. मंजूषा आणि त्यांचे पती किशोर नाईक यांनी अथक प्रयत्नांनी नीमला शोधले. मंजुषा यांना भेटताच नीमने त्यांना कडकडून मिठी मारली. मंजूषा तिला आपल्या घरी घेऊन आल्या. नीमला संस्थेत पाठविण्यापूर्वी तिच्यासाठी कपडे आदि सर्व खरेदी केली. त्यानंतर त्यांनी तिला स्नेहाधार संस्थेत दाखल केले. नीमचे पुनर्वसन करण्यासाठी स्नेहाधार या संस्थेच्या  संचालिका शुभांगी कोपरकर तसेच किशोरी ओगले यांची मोलाची साथ मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com