सिंहगडावर पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

खडकवासला - दाटून आलेले पांढरे शुभ्र ढग... रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या धारा.... अंगाला हळूवार स्पर्श करणारा वारा... अशा प्रसन्न वातावरणात पर्यटकांनी पावसाळ्याच्या पहिल्याच रविवारी सिंहगडावर गर्दी केली होती.

सिंहगडावर सकाळी नऊ वाजताच वाहनांमुळे पार्किंग फुल झाले होते. गोळेवाडी येथील उपद्रव शुल्क नाका बंद केला होता. पाऊण तासानंतर गाड्या लावण्यास जागा झाल्यानंतर पुन्हा वाहने सोडण्यात सुरवात केली. दरम्यान, वन विभागाच्या सिंहगड वनसंरक्षक समितीकडे शनिवारी एक हजार 315 दुचाकी, 493 चारचाकींचे 50 हजार 950 रुपये जमा झाले; तर रविवारी एक हजार 462 दुचाकी आणि 588 चारचाकी गडावर आल्या होत्या. त्यांच्याकडून 58 हजार 740 रुपये कर जमा झाला.

Web Title: sinhgad tourist