esakal | आळेफाटा : सायरन वाजला अन् मंदिरातील चोरीचा प्रयत्न फसला
sakal

बोलून बातमी शोधा

robbed

आळेफाटा : सायरन वाजला अन् मंदिरातील चोरीचा प्रयत्न फसला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : नळवणे (ता.जुन्नर) येथील श्री कुलस्वामी खंडेराया च्या गडावर तीन चोरट्यांनी चोरी (robbed) करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या सावधानते मुळे व सायरन वाजल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. (siren sounded and attempt rob temple failed)

हेही वाचा: बचत गटातील महिलांची फसवणूक; एकाला अटक

या बाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार (दि.१६) रात्री १.०५ वाजता तीन चोरट्यांनी मंदिर आवारात प्रवेश करून मंदिराचा पुढील दरवाजा फोडला. परंतु स्वयंचलित सायरन यंत्रणा चालू होऊन गडावरील सायरन चालू झाले. चोरटे सायरन वाजल्याने गडबडून गेले.सुरक्षाकांनी दुसरा मोठा सायरन वाजल्याने चोर पळून गेले. सर्व परिसरात सायरनचा आवाज गेल्याने गावातील सतर्क नागरिकांनी ताबडतोब मंदिराकडे अवघ्या १५ मिनिटात धाव घेत गडावर पोहचले.

केवळ देवस्थानची सतर्क सुरक्षा यंत्रणा व गावातील अंदाजे ८० ते १०० जागरूक नागरिक पोहचल्यामुळे चोर पळून गेले व चोर चोरी करू शकले नाही. आळेफाटा पोलीस तात्काळ उपस्थित झाले. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी देवस्थानला भेट देऊन पाहणी केली. देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ३ चोरटे दिसत असून, फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत. गावच्या नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली. तसेच, या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. सदर घटनेचा आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: आळंदीतून माऊलींच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ

loading image