पानशेत येथे बहीण भावाचा नदीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

खडकवासला : वरसगाव धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आई समवेत गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एक दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कुणाल दत्तात्रेय भगत (वय 17 ) आणि वैष्णवी दत्तात्रय भगत (वय 14) असे त्या दोन बहीण-भावंडांची नाव आहे.

ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक भोई समाजाचे बांधव, ग्रामस्थ यांच्या मदतीने त्यांचा पाण्यात शोध घेतला. दुपारी सव्वा चार वाजता त्यांचे मृतदेह सापडले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेमधून त्यांना ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांनी दिली. हे दोन बहीण- भाऊ त्यांच्या आई सविता भगत, मावस भाऊ व काका यांच्या समवेत व काकांच्या रिक्षातून वरसगाव धरण परिसरात कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यांची आई कपडे धूत असताना त्यांच्या आईचा पाय घसरून ती खोल पाण्यात पडली. 

यावेळी त्यांचा अठरा वर्षे वयाचा मावसभावाने त्यांच्या आईला काढण्यासाठी पाण्याकडे गेले. त्यावेळी त्यांच्या मागे दोन बहिण भाऊ देखील येत होते. त्यांना बाजूला केले आणि पुन्हा मावशीला करण्यासाठी तो पाण्यात उतरला. मावशीला पाण्याबाहेर काढले. परंतु त्या दरम्यान हे दोघे पाण्याच्या खोल बाजूला गेले. पोहता येत नसल्याने त्यावेळेस या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वडगाव बुद्रुक येथील कॉलेज रोड परिसरात येथे राहतात.

Web Title: Sister and brother drowned and died in Panshet