लंकेतून आयोध्येला जाणार सितामाईंच्या पादुका शुक्रवारी लोणीकाळभोरमध्ये

श्रीलंकेमधून महाशिवरात्रीच्या दिवशी अयोध्येच्या दिशेने निघालेल्या सितामाईंच्या पादुका शुक्रवारी (ता.११ मार्च) लोणी काळभोर ( ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणार आहेत.
Sitamai Paduka
Sitamai PadukaSakal
Updated on
Summary

श्रीलंकेमधून महाशिवरात्रीच्या दिवशी अयोध्येच्या दिशेने निघालेल्या सितामाईंच्या पादुका शुक्रवारी (ता. ११ मार्च) लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणार आहेत.

लोणी काळभोर - श्रीलंकेमधून (Sri Lanka) महाशिवरात्रीच्या दिवशी अयोध्येच्या दिशेने निघालेल्या सितामाईंच्या पादुका (Sitamai Paduka) शुक्रवारी (ता. ११ मार्च) लोणी काळभोर (Loni Kalbhor) (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणार आहेत.

श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण वधानंतर श्रीलंकेचा कारभार रावणाचे बंधू बिभीषण पहात होते. त्या वेळी सितामाईंनी या पादुका तेथे ठेवल्या होत्या. भारत सरकारच्या मागणीनुसार श्रीलंका सरकारने या पादुका भारताला दिल्या आहेत. रामनवमीच्या दिवशी या पादुकांची अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्रभु रामचंद्र व सितामाई वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले होते, त्या सर्व ठिकाणी या पादुका नेण्यात येणार आहेत.

Sitamai Paduka
भाजपच्या विश्वासावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याने देशात वाढता जनाधार - हर्षवर्धन पाटील

सितामाईंच्या पादुकांचे शुक्रवारी (ता. ११ मार्च) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारस आगमन होणार आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने लोणी काळभोर फाटा ते तीर्थक्षेत्र रामदरा अशी ढोल ताशांच्या गजरात या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी, सर्व भाविक भक्तांनी यावेळी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com