esakal | डिझेल चोरी करणार्‍या सहा आरोपींना अटक
sakal

बोलून बातमी शोधा


उरुळी कांचन : डिझेल चोरी करणार्‍या सहा आरोपींना अटक

उरुळी कांचन : डिझेल चोरी करणार्‍या सहा आरोपींना अटक

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ५ ट्रकमधून ८३ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरी करणार्‍या सहा आरोपींना जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. दत्ता विनोद रणधीर (वय- २२), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (वय - २७), वैभव राजाराम तरंगे (वय-१९), प्रतीक बन्सीलाल तांबे (वय- २६) रा. सर्वजण रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ता. हवेली, स्वरूप विजय रायकर (वय - २३, रा सूर्यवंशी मळा, अष्टापुर फाटा ता. हवेली) धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (वय - ३४ रा. टिळेकरवाडी ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: पुणे-सोलापूर महामार्ग परिसरातील अपघातात महिलेचा मृत्यू

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलिस ठाण्याच्या पोलिस हद्दीतून बुधवारी (ता. ०९ ) मध्यरात्री नांदूर येथील एका कंपनी समोर पार्किंग केलेल्या ५ ट्रक मधुन सुमारे ८३ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. तसेच शुक्रवारी (ता. ११ ) पारगाव येथील एका ट्रक मधून २५ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेल्याची तक्रार यवत पोलिस ठाण्यात दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सुरू केला असता मिळालेल्या माहितीच्या आदरे गुन्ह्याचा तपास करीत असताना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, उरुळी कांचन व परिसरातील काही संशयित इसम हे डिझेल चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला व वरील नावे असेलेल्या आरोपींना ताब्यात घेतले.

दरम्यान, आरोपींकडे चौकशी केली असता दोन चारचाकी गाडीतून बाहेर पडून वरील दोन्ही ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे. अधिक चौकशी केली असता गुन्हा करताना मोबाईल, दोन चारचाकी गाड्या, असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलिस नाईक विजय कांचन, राजु मोमिन, पोलिस हवालदार, अभिजित एकशिंगे, अमोल शेडगे, मंगेश भगत, धिरज जाधव, पूनम गुंड, दगडू विरकर यांचे पथकाने केली आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!

loading image