मुलीवर मांजरी खुर्द परीसरात बलात्कार; नातेवाईकासह सहा जणांना अटक

pt.jpg
pt.jpg

लोणी काळभोर (पुणे) : बुलढाणा जिल्हातून अपहरण झालेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द व कोलवडी परीसरात मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत पाच जणांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. वरील धक्कादायक प्रकार १७ जुन ते २ जुलै या दरम्यान मांजरी खुर्द हद्दीतील एका लॉजवर घडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बुलढाणा पोलिसांनी वरील पिडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एका मुलीच्या जवळच्या महिला नातेवाईकासह, तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पाच जणांना सहा दिवसांपुर्वी मांजरी खुर्द व कोलवडी परीसरातून अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे बलात्कार करणाऱ्या आरोपीत, पिडीत मुलीचे बुलढाणा येथून अपहऱण करणाऱ्या महिलेच्या पतीचाही समावेश आहे. 

दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी अनिता दिलीप पवार (वय ३० वर्षे, रा. मुळगाव पोखरी जि. बुलढाना, सध्या रा. महादेवनगर, मांजरी बुद्रुक ता. हवेली), हिच्यासह तिचा पती, दिलीप सखाराम पवार (वय ४० वर्षे), शंकर नाथा उंद्रे (वय ३७, रा. मांजरी खुर्द ता. हवेली), देवराम उर्फ पप्पु ज्ञानबा गायकवाड, सुभाष साहेबराव मांजरे (रा. दोघेही, कोलवडी ता. हवेली) व रंजीत मोहन शेळके (रा. वाघोली) या सहा जनांना सहा दिवसापुर्वी अटक केली आहे. बुलढाना पोलिसांनी महिलेसह वरील सहा आरोपींच्यावर अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी बुलढाना येथील पोलिस उपअधिक्षक महेश बरकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता पवार व तिचे पती, दिलीप यांनी आपल्याच नात्यामधील एका पंधरा वर्षीय मुलीला १७ जुन रोजी पळवुन आणुन मांजरी बुद्रुक येथील राहत्या घरी ठेवले होते. मुलीला मांजरी बुद्रुक येथील घरी आनताच, दिलीप पवार याने पत्नीच्या मदतीने मुलीवर बलात्कार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दिलीप पवार याने मुलीला मांजरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील शंकर उंद्रे यांच्या मालकिच्या एका लॉजवर नेऊन ठेवले. त्या ठिकाणी दिलीप पवार याच्यासह देवराम गायकवाड, सुभाष मांजरे व रंजीत शेळके या तिघांनीही वेळोवेळी बलात्कार केला. याच दरम्यान लॉजमालक शंकर उंद्रे यानेही अत्याचार केलाचा आरोप संबधित पिडीत मुलीने केला आहे. 

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याबाबतचा गुन्हा बुलढाणा २० जून रोजी बलढाणा पोलिसांत नोंदवला होता. या गुन्ह्याचा तपास करताना, मुलगी व अपहरण करणारे अनिता व दिलीप पवार मांजरी बुद्रुक हद्दीत असल्याचे बलढाणा पोलिसांना समजले. यावर पोलिस उपअधिक्षक महेश बरकते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिडीत मुलीसह, तिचे अपहरण करणाऱ्या अनिता व दिलीप पवार या दोघांना २ जुलै रोजी ताब्यात घेतले. तर मुलीने दिलेल्या जबाबानुसार, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या वरील चार आरोपींना पोलिसांनी सहा दिवसापुर्वी मांजरी खुर्द व कोलवडी परीसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपअधिक्षक महेश बरकते करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com