सिंहगडावर चढाई करीत 'त्यांनी' डोळसपणे अनुभवले 'तानाजीं'चे शौर्य

Six blind student experience Narveer Tanaji Malusare bravery by trekking on Sinhagad
Six blind student experience Narveer Tanaji Malusare bravery by trekking on Sinhagad

खडकवासला (पुणे) : सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या प्रबोधिनी निवासी अंधशाळेत शिकणारे ते सहा जण. शिक्षण कामानिमित्त पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे. त्या सहा जणांनी तान्हाजी चित्रपट ऐकून पाहिला अन् त्यांना ही सिंहगडावर चढाई करण्याचे वेध लागले.

शनिवारी सिंहगडावर आतकरवाडीतून पुणे दरवाज्याच्या दिशेने पायी आले. या पाय वाटेवर त्यांची गड कोटांचे अभ्यासक, ट्रेकर ऍड मारुती गोळे यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.  शनिवारी चढाई करीत त्या सहा जणांनी सिंहगडावरील नरवीरांचे शौर्य अनुभवले. आकाश सुतार, संदीप जानकर, गणेश कुंभार, संदीप कोळी, योगीराज सूर्यवंशी यश ताटकर हे सहा जण अंध आहेत.

सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या प्रबोधिनी निवासी अंधशाळेत शिकत होते. ​त्यातील काहीजण पुढील शिक्षण कामानिमित्त पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. यातील पिंपळे गुरव येथील ममता हॉस्टेल मध्ये राहतात तर काही जण दीपस्तंभ होस्टेल मध्ये राहतात. त्यांनी तान्हाजी चित्रपट ऐकून पहिला. यामुळे त्यांना सिंहगडाची भव्यता, शौर्यता, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज उभे करीत असलेल्या स्वराज्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी मुलाचे लग्न बाजूला ठेऊन गडावर केलेली चढाई. त्यात ते धारातीर्थी पडले. हे सर्व त्यांना चित्रपटामुळे अधिक समजले.

यामुळे हे सर्वजण सिंहगडावर जाण्यासाठी उत्सुक होते. शनिवारी सिंहगडावर आतकरवाडीतून पुणे दरवाज्याच्या दिशेने पायी आले. या पाय वाटेवर त्यांची गड कोटांचे अभ्यासक, ट्रेकर ऍड मारुती गोळे यांची भेट झाली. त्यांची विचारपूस करून छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देत त्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com