पिंपरी - आठ दिवसांत केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल, वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी शिताफीने अटक केली.
सनी गौतम घाडगे (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, मूळ रा. पातळशेत, ता. रोहा), सोमनाथ ऊर्फ सोन्या साहेबराव भगत (वय 19, रा. अजंठानगर, निगडी), सुधाकर ऊर्फ पिंटू तुकाराम सूर्यवंशी (वय 30, रा. बौद्धनगर, निगडी), सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 22, रा. विकासनगर, देहूरोड), संतोष अनिल गायकवाड (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी), गणेश सखाराम कोंडेकर (वय 21, रा. माले भांबुर्डे, ता. मुळशी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 16 मोबाईल, चार दुचाकी, दोन पिस्तूल हस्तगत करण्यात आले.
|