आळंदी-मरकळ भागातील सहा गुन्हेगार तडीपार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

आळंदी-मरकळ भागातील औद्योगिक भागात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या मरकळच्या सहा गुन्हेगारांना पिंपरीच्या पोलिस उपायुक्तांकडून पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर यांनी दिली.

आळंदी : आळंदी-मरकळ भागातील औद्योगिक भागात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या मरकळच्या सहा गुन्हेगारांना पिंपरीच्या पोलिस उपायुक्तांकडून पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर यांनी दिली.

तडीपार केलेल्या गुन्हेगारांमधे सागर दिलीप लोखंडे (वय २६), अक्षय सुरेश लोखंडे (वय २३), शुभम मुकेश लोखंडे (वय २४), शंकर पांडुरंग लोखंडे (वय २८), वाल्मीक ज्ञानेश्वर कोतवाल (वय २४), प्रशांत देविदास लोखंडे (वय २५) यांचा समावेश असून, सर्वजण मरकळ येथील रहिवाशी आहेत. तडीपार केलेल्या आरोपींवर यापूर्वी, खंडणी, गर्दी मारामारी, दरोडा, अवैधपणे शस्त्र बाळगणे, बेकायदा जमाव जमवून बळजबरीने जमिनीचा ताबा घेणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक असल्याचा गैरफायदा घेत सहाही गुंडांनी आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक विभागातील लोकांवर दहशत पसरविण्याचा प्रकार केला होता. यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी वेळोवेळी गुन्हे नोंदवून जेरबंद केले. मात्र तरिही त्यांचा उपद्रव थांबत नव्हता.  त्यातच विधानसभा निवडणूक आल्याने परिसरातील शांतता भंग होवू नये यासाठी पोलिसांनी सर्वांच्या तडीपारीचे पाऊल उचलले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six criminals police action in Alandi-Merkal area