
कामशेत : प्रधानमंत्री पीकविमा काढण्यासाठी शेवटचे सहा दिवस उरले आहेत, त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांचा विम्यासाठी समावेश करण्यात आला. विमा काढण्यासाठी ३१ जुलै अंतिम तारीख ठरविण्यात आली आहे.
- 'अभ्यासक्रम कमी केला, तशी 'फी' पण कमी करा'; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?
पीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्याने दोन टक्के विमा हप्ता रक्कम भरल्यास उरलेली ९८ टक्के रक्कम शासन भरणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत नजीकच्या बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्रात या सुविधा उपलब्ध आहे. विमा हप्ता ऑनलाईन भरता येणार आहे. विमा हप्ता भरताना अर्जासोबत शेतकऱ्यांनी सात बारा, आठ 'अ'चा उतारा, बँक खात्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत, स्वयंघोषित पीक पेरा प्रपत्र, टॅगिंग केलेला शेतकऱ्यांचा पिका सोबतचा फोटो ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
- एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी!
मध्यवर्ती बँक, आपले सरकार केंद्र, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, सोसायटी सचिव यांच्याशी पिक विमा योजनेत सहभागासाठी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने सुचविले आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी ९१० रुपये, विमा हफ्ता असून ४५ हजार ५०० रुपये संरक्षित विमा रक्कम आहे. भुईमुग पिकासाठी प्रति हेक्टरी ७०० रुपये विमा हफ्ता आकारण्यात येणार असून ३५००० हजार रुपये प्रति हेक्टरी रुपये, सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टर ९०० रुपये विमा हप्ता आकारण्यात आला असून ३५००० रूपये संरक्षित रक्कम राहणार आहे . या योजनेनुसार भात, सोयाबीन व भुईमुग पिकांचे प्रतिकूल परिस्थितीमध्ये पेरणी लावणी न झाल्यास पिकाच्या हंगामामध्ये पूर, पावसाने खंड दिल्यास, दुष्काळ अशा नसर्गिक आपत्तीमुळे काढणी पश्चात होणारे नुकसान व वरील प्रमाणे नैसर्गिक नुकसानीच्या बाबी विमा संरक्षणात समाविष्ट असल्याचे कृषी सहायक प्रियांका पाटील यांनी सांगितले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
''मावळातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मोठया प्रमाणात सोशल डिस्टसिग राखून व मास्कचा वापर करून घ्यावा'', असे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.