

Unique Pilgrimage Journey Two Young Men Travel By Skates And Bicycle To Visit Twelve Jyotirlingas Across India
esakal
ओतूर : धार्मिक श्रद्धेसोबतच जिद्द, साहस आणि प्रवासाची आवड यांचा अनोखा संगम पाहायला मिळत असून, बिहार राज्यातील रितीक कुमार (वय २१) हा गेल्या सहा महिन्यांपासून स्केटिंग करत बाराही ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर निघाला आहे. तर उत्तर प्रदेशातील रोहित पाल (वय १८ ) हा गेल्या तीन महिन्यांपासून सायकलवरून चारधाम यात्रा तसेच बाराही ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवास करीत आहे.