हिंजवडीत सहा दुकानांना आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

हिंजवडी (पुणे) : येथील लक्ष्मी चौकात शनिवारी (ता. 3) पहाटे सहा दुकानांना आग लागली. त्यात दुकानांमधील सर्व माल जळून खाक झाला. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्‍यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

महारुद्र ऑटो मटेरिअल्स, फायनल चॉईसचे कापड दुकान, जनता हार्डवेअर व इलेक्‍ट्रिकल, फेमस ग्लास वर्क्‍स, आसपुरा इंटेरियर किचन आणि एक दुचाकी गॅरेज ही सर्व दुकाने एका शेजारी एक असल्याने आगीत भस्मसात झाली. 

पीएमआरडीएचे अग्निशामक दल व हिंजवडी अग्निशामक दल फेज एक यांनी तीन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्‍यात आणली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा दुकानमालकांनी व्यक्त केला आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six shops fire in hinjwadi

टॅग्स