बारामतीमधील अपघातात सहा ऊस तोड मजूर गंभीर जखमी

नेपतवळ येथे एका मालवाहतूक टेंम्पोने माळेगाव साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर गाडीला जोरदार धकड
 Six sugarcane workers injured in accident  Baramati
 Six sugarcane workers injured in accident Baramatisakal
Updated on

माळेगाव : बारामती येथील नेपतवळ येथे एका मालवाहतूक टेंम्पोने माळेगाव साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर गाडीला जोरदार धकड दिली. त्यामध्ये सहा ऊस तोड मजूर गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवारी) वरील दुर्घटना घडली. विशेषतः या अपघातात जखमींनी कारखाना प्रशासनाला या घटनेची माहिती मोबाईलद्वारे दिल्याने संबंधितांना वेळीच वैद्यकिय उपचार मिळाले, अशी माहिती माळेगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. दरम्यान, रविवारी बारामती-मोरगाव रस्त्याने माळेगावचे ऊस तोड मजूर पहाटेच्यावेळी ट्रॅक्टर गाडीने बारामतीच्या दिशेने निघाले होते.

त्याचवेळी बारामतीच्या दिशेने निघालेला भरधाव माल वाहतूक टेंम्पोच्या चालकाचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो ट्रॅक्टर गाडीला मागच्या बाजूस आदळला. या दुर्घटनेत ऊस तोड मजूर भाऊसाहे शेवाळ, बाजिराव तुकाराम जाधव, हिराबाई एकनाथ शेवाळ, एकनाथ चव्हाण, उषाबाई बाजीराव जाधव, अंजू अशोक चव्हाण (सर्व रा. पुई ता.नांदगाव, जि. नाशिक, हल्ली मुक्काम माळेगाव ) हे जखमी झाले. माळेगाव कारखाना प्रशासनाच्या वतीने संबंधित जमखींवर बारामतीमधील खासगी रुग्णालयात वैद्यकिय उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाहुणेवाडी येथे मागिल पंधार दिवसांपुर्वी अशाचपद्धतीने माळेगावच्या ऊस तोड बैलगाड्यांना पहाटेच्यावेळी माल ट्रकने उडविले होते. त्या अपघातात दोन बैलांचा मृत्यु झाला होता, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com