स्त्री अत्याचाराचे दिवसभरात सहा गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पिंपरी : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवारी विविध पोलिस ठाण्यांमध्ये स्त्री अत्याचाराचे सहा गुन्हे दाखल झाले. त्यापैकी चार विनयभंगाचे, तर दोन बलात्काराचे गुन्हे आहेत.

पहिल्या घटनेत सचिन मुळे आणि कोमल मुळे (रा. नवले रेसिडेन्सी, काटे पेट्रोल पंपाजवळ, पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ३७ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १३ जूनला सकाळी आरोपींनी फिर्यादी महिलेचा पाठलाग करून, मोबाईलवर फोटो काढून अश्‍लील हावभाव करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सहायक निरीक्षक देवेंद्र शिंदे तपास करीत आहेत.

विनयभंगाच्या दुसऱ्या घटनेत रूपेश रघुनाथ दारवटकर, श्‍यामला संजय बाविस्कर, शुभांगी संजय बाविस्कर, सोनल अमित दीक्षित, अमित दीक्षित, अतिश भालसिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ४२ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. २० सप्टेंबर २०१३ ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीत आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेचा पतीच्या निधनानंतर छळ करून विनयभंगही केला. फिर्यादीच्या भाडेकरूंना दमदाटी करून हाकलून दिले. तसेच घराचा दरवाजा तोडून दागिने चोरून एक लाख रुपयांचे नुकसान केले.

विनयभंगाच्या तिसऱ्या घटनेत यलप्पा मारुती डोंगरे (वय २५, रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत २० वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ३ एप्रिल ते १३ जून या कालावधीत ही घटना घडली. आरोपी हा रिक्षाचालक आहे. फिर्यादी तरुणी रिक्षातून जात असताना त्याने त्या तरुणीचा हात पकडून ‘तू मला आवडतेस, तू माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणत विनयभंग केला. 

विनयभंगाच्या चौथ्या घटनेत असगरअली एम. तलवाई (वय ४५, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत २५ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १४) फिर्याद दिली आहे. २८ मे २०१८ रोजी दुपारी असगरअली याने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला.

बलात्काराच्या घटनेत सचिन डिडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. मे २०१६ ते एप्रिल २०१८ या कालावधीत चिखली येथे ही घटना घडली. पीडित महिला रस्त्याने जात असताना तिथे आलेल्या सचिनने फिर्यादी महिलेसोबत मोबाईलवरून सेल्फी काढला. हा फोटो तुझ्या पतीला दाखवतो, अशी धमकी देत वेळोवेळी बलात्कार केला. सहायक निरीक्षक योगेश आव्हाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

बलात्काराच्या दुसऱ्या घटनेत राम याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत २० वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे एका ठिकाणी काम करत असताना आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. फिर्यादी या गरोदर राहिल्यानंतर लग्न न करता फसवणूक केली. सहायक निरीक्षक वनिता धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: six women abuse case in one day