प्रामाणिकपणाच! सोळा लाखांच्या दागिन्यांची बॅग रिक्षाचालकांनी केली परत

Sixteen lakh jewelry bags were returned by the rickshaw driver in pune
Sixteen lakh jewelry bags were returned by the rickshaw driver in pune

पुणे : रेल्वेस्थानक परिसरामध्ये बेवारस अवस्थेत सापडलेली बॅग ताब्यात घेऊन दोन रिक्षाचालकांनी ती पोलिसांकडे दिली. पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये साडेसात लाख रुपयांचे सोळा तोळे सोने आढळून आले. पोलिसांनीही संबंधीत प्रवाशाचा शोध घेऊन ती बॅग त्याला परत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
अतुल पांडुरंग टिळेकर (वय 36, रा. हडपसर) व भरत किसन भोसले (वय 48, रा. गणेश पेठ) अशी बॅग परत करणाऱ्या रिक्षा चालकांची नावे आहेत. दीपक पांडुरंग चित्राला (रा. हडपसर) हे संगणक अभियंता असून ते त्यांच्या परिवारासह आंध्र प्रदेश येथून पुण्याला आला होते.

येस बँक प्रकरणात राणा कपूर यांच्या मुलीही आल्या अडचणीत!
पुणे रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर ते खासगी मोटारीने घरी गेले. मात्र नजरचुकीने त्यांच्याकडील एक छोटी बॅग रेल्वे स्थानक परिसरातच विसरून राहिली. चित्राला हे हडपसरला घरी पोचल्यानंतर बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते पुन्हा रेल्वे स्थानकाकडे निघाले. दरम्यान, तेथे उभ्या असलेल्या रिक्षाचालक टिळेकर व भोसले यांना ती बॅग दिसली. दोघांना प्रारंभी ती बॅग बॉंबसदृश वाटली. तरीही त्यांनी बॅग उघडली. त्या वेळी त्यांना बॅगेमध्ये सोने-चांदीचे दागिने आढळून आले. त्यांनी तत्काळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे बॅग दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com