जुन्या वाहनांच्या विक्रीतून 63 लाखांचा महसूल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

गुन्ह्यांच्या तपासात जप्त केलेल्या जुन्या वाहनांच्या विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला 63 लाखांहून अधिक महसूल मिळाला. विक्री केलेल्या भंगारमधील वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकीसह टॅंकरचा समावेश होता. 

पुणे - गुन्ह्यांच्या तपासात जप्त केलेल्या जुन्या वाहनांच्या विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला 63 लाखांहून अधिक महसूल मिळाला. विक्री केलेल्या भंगारमधील वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकीसह टॅंकरचा समावेश होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाकडून 2005 ते 2016 या कालावधीत गुन्ह्यांच्या तपासात वाहने जप्त केली होती. ती जुनी वाहने या विभागाच्या मंगळवार पेठेतील वेअर हाउस, ताडीवाला रस्ता, येरवडा येथील विभागीय उपायुक्‍त कार्यालयात आणि दौंड येथील निरीक्षक कार्यालयाच्या आवारात पडून होती.

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

या विभागाने न्यायालयाची परवानगी घेऊन जुन्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव केला. त्यात 672 दुचाकी, 53 तीनचाकी, 232 चारचाकी वाहने आणि तीन टॅंकर अशा एकूण 960 भंगारातील वाहनांचा समावेश होता. या वाहनांच्या विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला 63 लाख 46 हजार रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixty-three lakhs revenue from the sale of old vehicles

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: