बायकोला मेसेज पाठवला म्हणून, स्केटिंग प्रशिक्षकाचा खून

टीम ई-सकाळ
Friday, 6 December 2019

निलेश पुण्यातील गोखलेनगर येथे स्केटिंगचे प्रशिक्षण द्यायचा, तो इनर हॉकीचा राष्ट्रीय खेळाडू होता. निलेश सुसला ज्या सोसायटीत राहायचा तिथंच आरोपी विठ्ठल ही राहायला असल्याने त्यांची मैत्री झाली होती.

हिंजवडी : बायकोच्या मोबाईलवर किळसवाणा मेसेज पाठवला म्हणून, स्केटिंग प्रशिक्षकाची हत्या केल्याची कबुली मारुंजी खून प्रकरणातील आरोपीने दिली. हिंजवडी आयटी पार्क लगत असलेल्या मारुंजीच्या कोलते पाटील टाऊनशीप मध्ये बुधवारी (ता. ४) च्या सकाळी ही घटना उघडकीस आली होती. विठ्ठल ज्ञानोबा मानमोडे (वय 32, रा. विघनहर्ता बिल्डिंग सुस ता मुळशी) असं आरोपीचे नाव आहे.  तर निलेश शिवाजी नाईक (वय 24) असं खून झालेल्या स्केटिंग प्रशिक्षकाचे नाव होते . 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय घडलं दोघांमध्ये 
निलेश पुण्यातील गोखलेनगर येथे स्केटिंगचे प्रशिक्षण द्यायचा, तो इनर हॉकीचा राष्ट्रीय खेळाडू होता. निलेश सुसला ज्या सोसायटीत राहायचा तिथंच आरोपी विठ्ठल ही राहायला असल्याने त्यांची मैत्री झाली होती. निलेशचं विठ्ठलच्या घरी येणं-जाणं व्हायचं. याच ओळखीतून विठ्ठलच्या पत्नीचा निलेशकडे नंबर ही आला होता. याच दरम्यान विठ्ठलवर चतुरशृंगी  व वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एक एक गुन्हा दाखल असल्याने तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. त्यामुळे तो काही दिवस बाहेर अन काही दिवस घरी असायचा. अशातच घरी असलेल्या विठ्ठलच्या पत्नीला निलेशने किळसवाणा  मेसेज पाठवला. ही बाब विठ्ठलला समजली अन त्याने निलेशचा काटा काढण्याचं ठरवले. 

आणखी वाचा - एक फोन आला आणि अजित पवारांनी बैठका केल्या रद्द

आणखी वाचा - पुण्यात मटण थाळी 400 रुपये किलो होणार?

निर्जनस्थळी खून
निलेशचा काटा काढण्याच्या निमित्तानं मंगळवारी रात्री विठ्ठलनं पार्टीचा बेत आखला. निलेश एका साथीदाराला घेऊन तो मारुंजी येथील निर्जनस्थळी आला. तिथंच तिघे रात्रभर दारू प्यायले नशेत असतानाच विठ्ठल ने स्वतःच्या गाडीच्या डिकीत सोबत आणलेल्या कोयत्याने साथीदाराच्या मदतीने निलेशचा गळा कापला. घटनेनंतर हिंजवडी पोलिसाच्या तपास पथकाचे प्रमुख अनिरुध्द गिजे यांच्या टीम ने अवघ्या 24 तासात विठ्ठलला नवी मुंबई येथून अटक केली, तर साथीदार अद्यापही फरार आहे. पुढील तपास उद्धव खाडे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: skating coach murdered by his friend for sending message to his wife