बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी!

Job_Fair
Job_Fair

पुणे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरीकरीता बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून जिल्ह्यात सुमारे अडीच हजाराहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे जिल्ह्यातून इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत जिल्ह्यातील विविध उद्योजकांकडे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनिअर, अकाउंटंट, टीग वेल्डर या पदांसाठी आवश्यक पात्रताधारक तसेच, इयत्ता सातवी ते नववी, दहावी, बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण अडीच हजार पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करुन दिली आहेत.

हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगइन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावेत. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी. 

उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक आणि वेळ एसएमएस अलर्टद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. इच्छुक युवक युवतींनी 22 जूनपर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com