Panshet Dam
Panshet Damsakal

Khadakwasla Dam : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात किंचित वाढ

खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पाऊस झाला.

खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पाऊस झाला. यामुळे धरणसाठ्यात किंचितशी वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या नोंदीमध्ये दिसून आले.

या चार हि धरणात शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे १३ पानशेत मध्ये १८ वरसगावला २० टेमघर मध्ये २५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासला धरणात ०.९० टीएमसी म्हणजे ४५.७२ टक्के पाणीसाठा आहे. पानशेत १०.५८ टीएमसी म्हणजे ९९.४१ टक्के आहे. वरसगाव मध्ये १२.७१ टीएमसी म्हणजे ९९.१० टक्के पाणी जमा आहे. तर टेमघर धरणात २.९७ टीएमसी म्हणजे ८०.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

सकाळी चार हि धरणात मिळून २७.१५ टीएमसी म्हणजे ९३.१३ टक्के पाणीसाठा होता. संध्याकाळी पाच वाजता हा पाणीसाठा १७.१६ टीएमसी म्हणजे ९३.१७ टक्के पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, दिवसभरात खडकवासला धरणातून शहराला पिण्यासाठी आणि कालव्यातून १००५ क्युसेक पाणी शेतीसाठी सोडले जात आहे. अकरा तासात १३ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे.

वरसगाव धरणातून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. तसेच पानशेत धरणातून हि वीज निर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. दोन्ही धरणातून सोडलेला एकूण विसर्ग एक हजार २०० क्यूसेकचा विसर्ग थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com