सर्वोच्च वैज्ञानिक संस्थेचा ‘ढिसाळ’ कारभार

CSIR
CSIR

सीएसआयरच्या शिष्यवृत्तीसाठी अडथळ्यांची शर्यत; प्रक्रिया ऑनलाइन होणार
पुणे - देशाची सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) ढिसाळ कारभारामुळे संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑफलाईन असलेल्या या प्रक्रियेमुळे शिष्यवृत्ती मिळण्यास दिरंगाई होत असून अनेकदा कागत्रपत्रेही गहाळ होत असल्याचे संशोधक विद्यार्थी सांगतात. तर लवकरच ही प्रक्रीया देखील आम्ही ऑनलाइन करत आहोत, असा दावा सीएसआयआरच्या वतीने करण्यात आला आहे.

देशभरातील विद्यार्थी पीएचडीसाठी राष्ट्रीय पात्रता परिक्षा (नेट) देतात. विज्ञान शाखेची ही परीक्षा ‘सीएसआयआर’ घेते. याच परिक्षेत मेरिटमध्ये आल्यास विद्यार्थ्याला कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्ती प्राप्त होते. पीएचडीसाठी मार्गदर्शक आणि संशोधन संस्था निश्चित झाल्यावर विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सीएसआयआरकडे दिल्लीला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागतो. त्यानंतर सीएसआयआर सर्व कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थी, मार्गदर्शक आणि संशोधन संस्थेला एक क्रमांक देते. त्या आधारावर विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, बऱ्याचदा ही प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी चार महिन्यांचा वेळ लागत असल्याचे दिसते. पुण्यातील आयसरच्या एका संशोधक विद्यार्थ्याने नोव्हेंबर महिन्यातच अर्ज केला आहे. मात्र आजपर्यंत त्याची शिष्यवृत्तीची प्रक्रिया कुठवर आली, हे कळण्यास कोणताही मार्ग नाही. त्याने सीएसआयआरच्या मदत कक्षालाही त्याने मेल केला असून, मागील महिनाभरात त्याला साधे उत्तरही आलेले नाही.  दुसऱ्या एका विद्यार्थ्याला मागील तीन महिन्यांपासून शिष्यवृत्तीच प्राप्त झालेली नाही. अशा समस्या सोडविण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप केला असून, रोज अशा असंख्य तक्रारी पडत आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी ट्विटरवरून मोहीम देखील राबविली आहे.

संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सीएसआयआरच्या तीन प्रयोगशाळांमध्ये
प्रायोगिक तत्त्वावर त्याचे कार्यान्वयन करण्यात आले असून, पुढील काही महिन्यांत सर्व समस्यांचे निराकरण होईल.
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर.

प्रत्येक महिन्याला सीएसआयआरकडे हजेरी पत्रक आणि इतर कागदपत्रे पाठवावे लागतात. काहीवेळा ते गहाळपण होतात. अशावेळी दिल्लीला जाऊन भेटावे लागते. तसेच शिष्यवृत्तीची प्रक्रिया कुठवर आली हे कळायला कोणतीच सोय नाही.
- संशोधक विद्यार्थी, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे.

आकडेवारी

  • ३९ - सीएसआयआरच्या देशातील प्रयोगशाळा
  • ८००० - शिष्यवृत्तीप्राप्त संशोधक विद्यार्थी (अंदाजे)
  • ५०० ते ६०० - शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी येणारे अर्ज 
  • ५ वर्षे - शिष्यवृत्तीचा कालावधी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com