Fire-Brigade
Fire-Brigade

तोपर्यंत तर उडतो भडका!

पुणे - शहरातील एकाही झोपडपट्टीत अग्निशामक दलाचे वाहन (बंब) सहजपणे जाईल अशी स्थिती नाही. झोपडपट्टीतील रस्ते अरुंद असल्यामुळे अग्निशामक दलाला आपत्‍कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग शोधून घटनास्थळापर्यंत पोचावे लागते.

मार्केट यार्ड येथील आंबेडकर झोपडपट्टीस शनिवारी सकाळी आग लागली होती. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला आगीच्या ठिकाणापर्यंत बंब नेता आले नाहीत. किराणा भुसार मालाच्या बाजारातील रस्त्यांवर बंब उभे करून पाइप जोडून पाणी आत न्यावे लागले.

झोपडपट्टीतील दाट वस्तीत आग लागल्यानंतर तेथे पोचून ती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक मार्ग नसणे हीच मोठी अडचण ठरते. जीवितहानी टाळता आली, तरी छोट्या रस्त्यांमुळे वित्तहानी टाळता येत नाही.  

याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दुजोरा देत ते म्‍हणाले, ‘‘शहरांतील झोपडपट्टीतील आत्पकालीन परिस्थितीत कोणते मार्ग आहेत, याचा आढावा काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. शहरातील एकाही झोपडपट्टीत अग्निशामक दलाचा बंब सहजपणे पोचेल अशी स्थिती नाही. दलाकडे असलेली छोटे वाहने आत नेण्यासाठी किमान अडीच मीटर रुंद एवढी तरी जागा हवी. मात्र तीही उपलब्ध नसते. त्यामुळे बंब बाहेरील रस्त्यावर म्हणजेच जेथे जागा उपलब्ध आहे अशा जवळच्या ठिकाणी उभा करून पाइप जोडून आत पाणी न्यावे लागते. साधारणपणे दीडशे मीटर लांबीचा पाइप बंबामध्ये असतो. मात्र पाइपची लांबी वाढली, तर आग आटोक्‍यात आणण्यासाठी अपेक्षित दबावाने पाणी फेकले जात नाही. त्यामुळे आग नियंत्रणात येण्यास विलंब होतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com