विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डद्वारे सुविधा

Savitribai-Phule-University
Savitribai-Phule-University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी, तसेच वेगवेगळी कामे आणि सुविधांसाठी एकच कार्ड असावे म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड दिली आहेत. वर्गातील हजेरीबरोबरच ग्रंथालय आणि सुरक्षा तपासणीसाठी हे एकच कार्ड वापरता येणार आहे.

विद्यापीठात अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतल्यानंतर एक ओळखपत्र देण्यात येते. जयकर ग्रंथालयात जाण्यासाठी वेगळे ओळखपत्र दिले जाते. यामुळे एकापेक्षा अधिक कार्ड विद्यार्थ्यांना जवळ बाळगावे लागतात.

विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्वच सुविधा एकाच कार्डद्वारे मिळाव्यात या उद्देशाने सर्व प्रक्रियांसाठी एकच कार्ड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन हजार विद्यार्थ्यांना कार्ड देण्यात आले आहे. पुढील आठवडाभरात उर्वरित विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळणार आहे.आरएफआयडी या तंत्रज्ञानावर आधारित हे कार्ड आहे. त्यातील चीपमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश घेतल्यापासूनची सर्व माहिती असेल. 

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, जयकर ग्रंथालयातील प्रवेश, पुस्तकांचे वितरण, खानावळ (रिफेक्‍टरी), सुरक्षा तपासणी या कामांसाठी एकच कार्ड वापरता येईल. विद्यार्थ्यांना एकाच कार्डवर सर्व सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला. शिष्यवृत्तीची माहिती, विद्यार्थ्याने जयकर ग्रंथालयातून घेतलेल्या पुस्तकांची माहिती, कमवा व शिका योजना यांसह सुमारे बारा बाबींची माहिती या कार्डमध्ये असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकत्रित डाटा ऑनलाइन उपलब्ध होईल. किती विद्यार्थ्यांनी सुविधांचा लाभ घेतला, ग्रंथालयाचा वापर केला हेही यातून समजणार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com