स्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच - अजित पवार

संदिप जगदाळे
शनिवार, 2 जून 2018

हडपसर (पुणे) : भाजपने हडपसरला पुणे शहराचा कचरा आणून मातीत घातले. हडपसरला मेट्रो, रिंगरोड, पुरेसे पाणी या पायाभूत सुविधांपासून दूर ठेवले. पालिकेत केवळ तोडपाणी सुरू आहे. स्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच आहे. पालकमंत्र्यांनी या शहरासाठी काहीही केलेले नाही. केवळ ते दाढी काळी कुळकुळीत करून पुणे करांची फसवणूक करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे नागपुरकडे लक्ष आहे, त्यामुळे त्यांना पुण्याच्या विकासात रस नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, आमदार अॅड. जयदेव गायकवाड, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, पुणे शहर महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा महिला अध्यक्षा संगिता घुले, नगरसेवक वैशाली बनकर, प्रशांत जगताप, आनंद आलकुंटे, रत्नप्रभा जगताप, योगेश ससाणे, हेमलता मगर, अशोक कांबळे, पुजा कोद्रे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, पंचायत समिती उपसभापती अजिंक्य घुले,शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा वासंती काकडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक शिवाजी पवार, सुनिल बनकर, फारूख इनामदार,  राकेश कामठे, डॅा. शंतनू जगदाळे, सागरराजे भोसले, भानूदास शिंदे, विक्रम जाधव उपस्थित होते. 

चेतन तुपे म्हणाले, हडपसर मतदार संघात सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे निवडून आले आहेत. पक्ष वाढविण्यासाठी हडपसर विधानसभा मतदार संघात १० हजार पंचवीस कार्यकर्ते नेमण्यात येणार आहेत. त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत साधण्याचे नियोजन केले आहे. अजित दादांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येत घरात व तळागाळात जाऊन काम करणार आहेत. 

Web Title: smart city is on documents only said by ajit pawar