शाश्‍वत उपाययोजनांसाठी ‘स्मार्ट सिटी हॅकॅथॉन’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे - शहरातील विविध समस्यांची उकल आणि त्यावर शाश्‍वत उपाययोजना कशी करावी, याबाबतच्या संकल्पना आणि नमुने सादर करण्यासाठी पुण्यातील पहिले ‘स्मार्ट सिटी हॅकॅथॉन’ आयोजित केले आहे. ‘ऑनलाइन हॅकॅथॉन’ स्पर्धेची सुरवात शुक्रवारपासून झाली असून, ‘ऑफलाइन हॅकॅथॉन’ २९ सप्टेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि डिजिटल कनेक्‍टिविटी हे हॅकॅथॉन स्पर्धेतील विषय असणार आहेत.

शहरातील स्टार्टअप्स्‌ना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पिफ’च्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येतील. याअंतर्गत नीती आयोगाच्या सहकार्याने हे ‘हॅकॅथॉन’ होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस आदी उपस्थित होते.

स्पर्धेची संकल्पना
 स्पर्धकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शहरासाठी शाश्‍वत उपाय सुचविणे
 या उपाययोजना उत्पादनाच्या स्वरूपात किंवा अंमलबजावणीच्या उदाहरणासह नावीन्यपूर्ण कल्पना असतील
 स्पर्धक संघांना समान संधी देण्यासाठी ‘सोल्यूशनथॉन’ आणि ‘आयडियाथॉन’ अशा दोन स्वतंत्र प्रकारांत मूल्यांकन 
 प्रस्तावित उपाययोजनेची पातळी आणि त्यांची शहरात अंमलबजावणी करण्याची शक्‍यता लक्षात घेण्यात येणार

Web Title: Smart City Hackathon